२.पुरवणी वाचनाचे महत्व :
१.वाचन व लेखन कौशल्याचा विकास करण्यासाठी इतर पुस्तके ,हस्तलिखिते,नियतकालिके वाचली जातात त्यास पुरवणी वाचन म्हणतात.
२.विद्यार्थांचा भाषा विकास व्हावा व त्याचे मनोरंजन व्हावे .
३.विद्यार्थांना निरनिराळ्या साहित्य प्रकारची ओळख होते.
४.विद्यार्थांच्या पुरवणी वाचनातून मानसिक व व्यक्तिमत्व विकास होतो.
|
४.नियतकालिके महत्व :
१.नियत म्हणजे निश्चित वेळात निघणारी मासिके म्हणजे नियतकालिके होय.
२.नियातकालीचा उद्देश ज्ञान व मनोरंजन होय.
३.लहान मुलांसाठी नियतकालिके ,चांदोबा ,किशोर,कुमार,खेळगडी,छावा आहेत.
४.नियतकालिके शाळेच्या वाचनालयात ठेवावी.
|
५.अध्यापनाच्या शैक्षणिक साधनाचे प्रकार :
१.दृक –साधन : फक्त डोळ्याने पाहण्यासाठी हे साधन उपयुक्त आहे.
१.चित्र : अमूर्त कल्पना मूर्त करण्यासाठी चित्र आवश्यक आहेत.
१.झलक चित्र : थोर पुरुषांच्या जयंत्या ,पुण्यातीथ्या,सण,उत्सव,व विविध कार्यक्रमासाठी शाळेत प्लेनेल बोर्डवर झलक चित्र लावतात.
२.फलक चित्र : पाठाचा आशय स्पष्ट करण्यासाठी फलक चित्राचा उपयोग होतो.
२.तक्ते : भाषा विषयातील धडे शिकवण्यासाठी .
३.खादी फलक : वर्णमाला शिकवण्यासाठी .
४.शब्दापटटया : वर्णमाला शिकवण्यासाठी.
५.वार्ताफलक : हा शाळेचा आरसा आहे.
६.प्रतिकृती : मोटार,विमान,मेंदू,हदय,डोळा,यांचे हुबेहूब पुतळा म्हणजे प्रतिकृती होय.
७.फलक /शब्दपटटया : अस्पष्ट संबोध स्पष्ट करण्यासाठी व शब्दार्ध ,महत्वाचे विचार ,कल्पना,व्याख्या लिहिण्यासाठी .
८.चित्रदीप : चित्र दीपाला चित्र घातल्यास ती भिंतीवर मोठी दिसतात.
९.कळसूत्री बाहुल्या: हात बाहुल्या ,दोरीवर चालणाऱ्या बाहुल्या ,छंद बाहुल्या ,छाया बाहुल्या हे बहुल्याचे प्रकार आहेत.
१०.संग्रह प्रदर्शन : मुलांना रंगीत कागद,चित्रे ,चिंचोके,गोट्या ,बिया,मणी,यांचा संग्रह करण्याची वृत्ती असते.
११.एपिडायस्कोप : कथाकथन ,अक्षर ओळख व प्रवास वर्णन यासाठी याचा उपयोग होतो.
१२.ओहार हेड प्रोजेक्टर : चित्र किंवा लिखित मजकुर प्रक्षेपीत करता येतो.
२.श्राव्य साधन : फक्त कानाने ऐकण्यासाठी साधन उपयुक्त आहे.
१.ग्रामोफोन : ध्वनी मुद्रित केलेले राष्ट्रगीत ,प्रार्थना,परिपाठ,प्रतिज्ञा मुलांना ऐकविणे .
२.आकाशवाणी : रेडीओ मध्ये येणारे रोजचे कार्यक्रम मुलांना ऐकविता येतात घरबसल्या एकाचवेळी अनेकाचा या साधनांनी उपयोग होतो.
३.टेपरेकॉर्डर : ध्वनिलीफीत ग्रामोफोन व रेडीओ यांचा मिलाप असणारे साधन म्हणून टेपरेकॉर्डर होय.मुलाचे उच्चार दोष सुधारण्यासाठी हे साधन उपयुक्त आहे.
३.दृक –श्राव्य साधन :
डोळ्याने पाहणे व कानाने ऐकण्यासाठी हे साधन उपयुक्त आहे.
१.दूरचित्रवाणी : जे प्रत्येक्ष आपण पाहू शकत नाही असे सर्वच गोष्टी घर बसल्या आपण पाहू शकतो.
२.बोलपट चित्रपट : चित्रपटातील पडद्यावरील चित्र मुलांना सजीव वाटतात त्यामुळे मिळणारे अनुभव पराभावी असतात.
|