भाषिक कौशल्य क्षमता :- वाचन |
१.वाचनाचे महत्व : १.आकलनासह केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन होय. २.वाचनामुळे व्यक्तीमहत्वाचा अंतर्बाह्य विकास होतो. ३.वाचनाने वाणीवर सुसंस्कार होतात. ४.वाचनाने सौदर्य बोध व आनंदबोध घ्या दोन्ही साध्य होतात. ५.वाचन क्षमतेचा परिपूर्ण विकास हा त्यातुन निघणाऱ्या अर्थनिष्पतीवर अवलंबून असतो. |
२.वाचनाची प्रमुख उद्दिष्टे : १.ज्ञान प्राप्ती :ग्रंथाचे व इतर पुस्तकाचे वाचन केल्यामुळे ज्ञान प्राप्ती होते. २.आनंदप्राप्ती :आनंदप्राप्तीसाठी उत्तम साहित्याचे वाचन व्हावे. ३.संस्कार :व्यक्तीच्या मनावर चांगले संस्कार वाचनातून होतात. ४.रसास्वाद :कथा,काव्य,कादंबऱ्या ,नाटके ,यातून रसग्रहण दृष्टी लाभते. ५.आनंदवृत्ती :वाचनामुळे मन आनंदाच्या अनुभुतीने भरून जाते. |
३.वाचनाची पूर्वतैयारी करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी : १.शारीरिक तयारी : १.वाचन कौशल्याची शरीरातील ज्ञानेंद्रिय परिपक्व व्हायला हवीत. २.श्वासावर ताबा असावा. २.भावनिक तयारी : १.आवाजात चढ-उतार करण्याची क्षमता यावी. २.भावनिक समतेसाठी मनाची तयारी हवी. ३.बौद्धिक तयारी : १.व्यक्ती,वस्तु,स्थल,प्रसंग यांचा सहचर्य समजण्याची क्षमता असावी. २.मेंदूची संदेश ग्रहण करण्याची तयारी असावी. |
४.वाचनाचे प्रकार : |
५.प्रगट वाचनाचे शिक्षणातील महत्व : १.उच्चार स्पष्टता :संयुक्त स्वराचे व व्यंजनाचे उच्चार अचूकपणे करणे. २.ओघ व अस्खलितपणा :एक शब्द किंवा अनेक शब्दाचे योग्य शब्दसमूह करून वाचन करणे. ३.स्वाभाविकता:-वाचन बोलण्यासारखे व्हावे . ४.भावपुर्णता :चेहऱ्यावर हवभाव व आवाजात चढउतार करावा. |
६.मुकवाचनाचे शिक्षणातील महत्व : १.स्वतंत्रपणे आशय समजुत देणे:- मनोगत वाचन हा प्रगट वाचनाचा प्राण आहे तो स्वतंत्रपणे आशय समजावुन देतो . २.गती-संगती प्रगती साधने :वाचनाची गती वाढवणे व वाचलेल्याची संगती ओळखणे. ३.यथार्थता :-लेखनाच्या अनुभुतीचा साक्षात्कार पुर्णपणे आपल्याला मुकवाचाने होतो. |
७.प्रगटवाचन व मुकवाचनातील फरक : |
८.वाचनातील दोष व त्यावर उपाय : १.अस्पष्ट आवाजात वाचन करणे :-दैवत-देवत. २.चुकीचे उच्चारण : श,ष,स. ३.उच्चार भेदाचे अज्ञान वाचा व दृष्टीदोष . ४.वाचनातील अशुध्दता :तीर्थ ,तिर्थ. ५.अपूर्ण शब्द उच्चारण . ६.अडखळत वाचणे हेलकाढून वाचणे . ७.चुकीच्या जागी शब्द तोडून वाचणे. ८.शब्द गाळणे नवीन शब्द टाकून वाचन करणे. |
९.वाचन कौशल्यात शारीरिक व्यंगामुळे निर्माण झालेल्या उणीवा व उपाय . नाक,कान,डोळा,जिव्हा,दात :-डॉक्टर कडून करणे. |
१०.वाचनातील योग्य आसनबंध : १.पाठीचा कणा ताठ असावा. २.प्रकाश डावीकडून यायला हवा. ३.दृष्टीच्या पातळीशी ४० अंश कोन करणे. ४.पुस्तक व नजर यात ९ ते १२ इंच अंतर आहे. ५.झोपुन वाचणे घातक आहे. ६.पुस्तक वाचताना संपूर्ण उघडणे डावाहात खाली ठेवणे. ७.इतर काम करतांना पुस्तक वाचू नये. ८.उभे राहून पुस्तक वाचतांना दोन्ही पायावर सरळ भार द्यावे . |
११.निकोप वाचन सवयी : १.पुस्तकावर खुणा करू नये. २.पुस्तकाला कव्हर घालावी . ३.वाचलेल्या पुस्तकातील मुद्दे वहीत नोंदवी . ४.दुसऱ्याचे अथवा ग्रंथालयाचे पुस्तक वेळेवर नेऊन द्यावे. ५.वाचनलेले पुस्तक कपाटात बंद करू ठेवावे. ६.वाचलेल्या पुस्तकावर स्वताचा अभिप्राय तयार करणे. |
१२.वाचन कौशल्य विकासाठी उपक्रम : १.भिन्न-भिन्न प्रकारचे वाचन तक्ते दाखवणे अर्थ स्पष्ट करणे. २.कार्डस ,कृतीदर्शक चित्रे दाखवणे. ३.टेपरेकॉर्डर च्या माध्यमातुन स्पर्धा घेणे . ४.भाषेचे खेळ व पाठांतर स्पर्धा घेणे. ५.भेंड्या व व्याकरणाचे खेळ घेणे . ६.अवांतर वाचन करायला लावणे. |
१३.परिणामकारक वाचन कौशल्याची वैशिष्टे : १.सुस्पष्ट वाचन : प्रत्येक अक्षराचा व शब्दाचा उच्चार सुस्पष्ट होणे आवश्यक आहे. २.योग्य आरोह -आवरोह : उतार –चढाव होय. ३.स्वराघात : स्वरावर जोर देणे. ४.गती :योग्य गतीने वाचन करणे. ५.लय : काव्य वाचनाचे महत्वाचे लक्षण लय आहे. ६.योग्य हवाभाव :-डोळे ,भुवया ,मान,हाताची हालचाल. |
मुख्य पृष्ठ |