topics2

topics2
भाषिक कौशल्य क्षमता :- श्रवण

१.श्रवण हा भाषा शिक्षणाचा पाया आहे:
१.श्रवण : अर्थपूर्ण ऐकण्याची प्रक्रिया .
२.भाषण : बोलणाऱ्याच्या शब्दा मधून होणाऱ्या भावना.
३.वाचन :आकलनास केलेले ध्वनी उच्चारण .
४.लेखन : अक्षर अविनाशी बनविण्याची क्षमता.
५.ऐकूण वाचून संकल्पना समजावून घेणे.
६.कार्यात्मक व्याकरण शिकणे .
७.भाषेचा व्यवहारात उपयोग करणे.
८.शब्द संपत्तीवर प्रभुत्व मिळवणे.
९.स्वय अध्ययन करणे.
ह्या नऊ क्षमता पैकी सर्वात मुलभूत क्षमता म्हणजे श्रवण क्षमता आहे म्हणून श्रवण भाषा शिक्षणाचा पाया आहे.
२.श्रवणाचे महत्व :
१.श्रवण क्षमता सर्व क्षमता पायाभुत क्षमता आहे श्रवण कौशल्यावर भाषा विकास अवलंबून आहे.
२.श्रवणामुळे अर्थग्रहण होतो व अर्थग्रहण होणे म्हणजे अर्थाचे आकलन होणे पण अवधाना शिवाय श्रवण होत नाही.
३.अर्थपूर्ण ऐकण्याच्या प्रक्रियाला श्रवण म्हणतात.
४.श्रवण ज्ञान ग्रहणाची गुरु किल्ली आहे.
५.श्रवण कर्ण इंद्रियाद्वारे होते व त्यातुन ७० टक्के ज्ञान मिळते.

३.श्रवण क्षमता विकासाचे अंगे किंवा मुद्दे :
१.लक्षपूर्वक ऐकणे.
२.संदर्भ लक्षात घेऊन ऐकणे .
३.ध्वनीचे विश्लेषण करणे.
४.शब्दाचे परस्पर संबंध लक्षात घेणे.
५.शब्दाचा व शब्दसमुहाचा अर्थ लावणे.
६.शब्दांचा व शब्दसमुहाचा अर्थ लावणे.
७.मुख्य मुद्दे लक्षात घेणे.
८.भाषेतील चुका व विशिष्ट सवयी लक्षात घेणे.
९.भाषा व शैली सामर्थ्य लक्षात घेऊन अर्थ ग्रहण करणे.
१०.योग्य प्रतिसाद प्रतिक्रिया व्यक्त करणे.

४.श्रवण क्षमता विकासाचे उद्दिष्टे :
१.अवधानपूर्वक ऐकण्याची सवय लावणे.
२.आनंद प्राप्ती .
३.अर्थग्रहण करण्यासाठी श्रवण करण्याची सवय लावणे.
४.वर्गीकरण व विश्लेषण करण्यासाठी श्रवण करण्याची सवय.
५.सर्जनशीलतेचा विकास साधण्यासाठी श्रवणाची सवय.
६.भाषेचा अभ्यासाची पूर्वतैयारी करण्यासाठी श्रवण करणे.
७.मूल्यमापन करण्यासाठी श्रवण करण्याची सवय लावणे.

५.श्रवण क्रीयेसंबंधीचे शिष्टाचार :
१.बोलणाऱ्याचे बोलणे शांतपणे ऐकणे.
२.बोलणारला बोलतांना न आवडने.
३.बोलणाऱ्या व्यक्ती बदल आदर बाळगणे .
४.बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याला योग्य प्रतिसाद .
५.बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याती प्रसंगानुरूप चेहऱ्यावर हावभाव करणे.
६.बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याती महत्वाचे मुद्दे मनात न नोंदता वहीत नोंदुन ठेवणे.
६.श्रवण करतांना टाळावयाच्या कृती :
१.योग्य अर्थग्रहण होणार नाही.
२.श्रवण दोष निर्माण होतील.
३.त्या व्यक्तीचा मनभंग झाल्यास ती आपल्यासी व्यवस्थीत बोलणार नाही.
४.त्या व्यक्तीला आपल्याला सांगणे चांगले वाटणार नाही.
५.उगीच हातपाय हलवणे मान हेडगाळणे,चेहऱ्यावर तिरस्कार दाखवणे योग्य नव्हे .
६.विस्मरण होण्याची शक्यता असते.

७.श्रवण शुद्ध होण्यासाठी घ्यावयाची दक्षता :
१.अवधान : अवधानाशिवाय अर्थग्रहण होत नाही.
२.गती : बोलणाऱ्याच्या गतीनुसार ऐकणाऱ्याने ऐकायला हवे.
३.उच्चार शुध्दता व शुध्द उच्चारण : निर्दोष अर्थ ग्रहण करण्यासाठी शुद्ध अच्चार आवश्यक आहे.
४.श्रवण शुद्धता : बोलणाऱ्याचे बोलणे जसे शुद्ध हवे तसेच ऐकणाऱ्याचे श्रवण शुध्द असावे.

८.श्रवण दोष किंवा उणीवा व त्यावरील उपाय :
१.शारीरिक पातळीवरील उणीवा :कर्ण इंद्रियास दोष असणे डॉक्टरला भेटून ध्वनी मुद्रण यंत्र बसून घ्यावे.
२.मानसिक पातळीवरील उणीवा :
१.अश्रवण किंवा अर्थहीन श्रवण : जेव्हा ऐकूण ही अर्थबोध होत नाही तेव्हा अश्रवण होते उदा-शिक्षकाचे अध्यापन .
२.अर्धश्रवण किंवा अपुरे श्रवण : अर्धवट ऐकण्यालाच अपुरे श्रवण म्हणतात उदा –मी गेलो नाही फक्त मी गेलो ऐकणे .
३.अप श्रवण किंवा अशुद्ध श्रवण : चुकीचे ऐकणे म्हणजे अपश्रवण होय हे अध्यायनाच्या दृष्टीने अतिशय घातक असतो उदा-गेलो ऐवजी मेलो.
४.श्रवण क्रीयेसंबंधीचे शिष्टाचार पाळावे .

९.श्रवणातुन आनंदानुभुती मिळवण्यासाठी शाळेत योजावयाचे उपक्रम :
१.बालगीते,समूहगीते ,बडबडगीते,बालनाट्य.
२.गप्पा गोष्टी ,गाणी ,पाठांतर ,भेंड्या ,अंताक्षरी.कोडी ,उखाणी लावणे.
३.कविता ,श्लोक ,भुपाळी ,अभंग ,ओव्या,भजने .पोवाडे याचे गायन करणे.
४.टेपरेकार्डर व रेडीओ मधील गीत ऐकणे.

१०.श्रवण क्षमता विकसणातील घटक किंवा (अध्यापनाचे तंत्रे )
१.वर्णन : व्यक्ती ,वस्तु,स्थळ,प्रसंग,याचे चित्र उभे करण्यासाठी भाषण करणे मुलाची जिज्ञासा वाढवणे.
२.कथन : घटना,इतिहास ,चारित्र्य ,कथा याचे कथन करणे कथनाला रसभरीतपणा हा गुण आवश्यक आहे.
३.स्पष्टीकरण :कविताच्या ,पंक्ती ,संभाषिते ,वाक्यप्रचार ,म्हणी ,कठीण,शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी स्पष्टीकरण करणे.
४.विवेचन : एखाद्या विषयाची साधक बाधक चर्चा करणे.
५.नाटीकरण : स्वरात चढ-उतार व चेहऱ्यावर हावभाव करून पत्रानुसार भाषण करणे म्हणजे नाट्यीकरण करणे होय नाट्यीकरण करतांना वेशभुषां,केशभुषा ,रंगभूषा ,नेपथ्य ,प्रकाश इत्यादी गोष्टीची आवश्यक असते.

११.नाट्यीकरणाचा वापर करतांना लक्षात घ्यावयाचे मुद्दे :
१.योग्य घटकाची निवड .
२.योग्य पात्राची निवड.
३.योग्य साधनांची निवड .
४.योग्य जागेची निवड.
५.योग्य भाषा आणि संवाद योजना .
मुख्य पृष्ठ